Ad will apear here
Next
क्लिअरटॅक्स आणि झेरोधाची भागीदारी
मुंबई : भारतातील आघाडीची कर, वित्तसहाय्य आणि बिझनेस कम्प्लायन्स कंपनी क्लिअरटॅक्स आणि भारतातील अग्रगण्य तंत्रज्ञान-प्रेरित ब्रोकरेज कंपनी झेरोधा यांनी भागीदारी केली आहे. 

इक्विटी किंवा डेरिएटिव्ह्जच्या शेकडो व्यवहारांच्या नोंदी हाताने करणे ही अत्यंत दमवणारी प्रक्रिया आहे आणि यात चुकांची शक्यता अधिक असून, त्यामुळे दंड होण्याची शक्यताही वाढते. क्लिअरटॅक्स आणि झेरोधामधील भागीदारीचे लक्ष्य अशा समस्या टाळण्यात मदत करणे आणि कर भरणे काही क्लिक्सच्या मदतीने शक्य करणे हे आहे. वापरकर्ते एकूण उलाढाल, दीर्घकालीन लाभ, लघुकालीन लाभ, एकूण भांडवली लाभ आणि ऑडिट पात्रतेचा तपशीलवार सारांश क्लिअरटॅक्स पोर्टलवर केवळ झेरोधा पी अँड एल अहवाल अपलोड करून बघू शकतात.

 क्लिअरटॅक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले, ‘एक एप्रिलपासून दीर्घकालीन भांडवली लाभांवर कर लावला गेल्याने गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. क्लिअरटॅक्सच्या तंत्रज्ञानाचा वापर करून, कर भरण्याच्या तयारीचे ऑटोमेशन झाले तर ही समस्या सुटू शकते हे आमच्या लक्षात आले. झेरोधासोबत एकात्मीकरण होत असल्याने गुंतवणूकदार समुदायासाठी कराचे नियोजन व करभरणा सोपा होणार आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZSCBQ
Similar Posts
‘क्लिअरटॅक्स’द्वारे ‘जीएसटीआर-९’ सॉफ्टवेअर सादर मुंबई : भारताच्या आघाडीच्या टॅक्स, जीएसटी अनुपालन आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकीत अग्रेसर ‘क्लिअरटॅक्स’तर्फे ‘जीएसटीआर-९ फायलिंग’ सॉफ्टवेअर सादर केले आहे. हे सॉफ्टवेअर सनदी लेखापाल (सीए) तसेच व्यावसायिकांना कोणत्याही अडचणीशिवाय ‘जीएसटीआर-९’ भरण्यासाठी मदत करणार आहे.
क्लियरटॅक्स ई वे बिल सादर मुंबई : व्यवसायाचे अनुपालन सोपे आणि सोयीस्कर बनविण्याचा आपला उद्देश अधोरेखित करत, ‘क्लियरटॅक्स’ या भारताच्या अग्रगण्य टॅक्स आणि अनुपालन मंचाने अलीकडेच ‘क्लियरटॅक्स ईवे बिल’ लाँच केले आहे. कोणत्याही इआरपी प्रणालीशी जुळवून घेणारे क्लियरटॅक्स ईवे बिल हे एक अत्यंत वेगवान सॉफ्टवेअर आहे, ज्याचा उद्देश आहे व्यवसायांसाठी ईवे बिल अनुपालन अत्यंत सोपे करणे
‘क्लिअरटॅक्स’तर्फे ‘जीएसटी हेल्थ चेक कंप्लायन्स टूल’ सादर मुंबई : ‘क्लिअरटॅक्स’ या टॅक्स, फायनॅन्स आणि अनुपालन सोल्युशन पुरवठादार कंपनीतर्फे ‘जीएसटी हेल्थ चेक’ हे नवीन टूल सादर करण्यात आले आहे. हे टूल एखाद्या व्यवसायाच्या जीएसटी हेल्थचा तपशीलवार रिपोर्ट काढून त्या व्यवसायाला डेटाचा आधार असलेली जीएसटीविषयक माहिती देते. अचूक इनपुट टॅक्स क्रेडिटच्या दाव्यासाठी,
क्लिअरटॅक्स आयकर विवरण सुविधा आता शाओमीच्या कॅलेंडर अॅपवर मुंबई : आयकर विवरणपत्र सादर करण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख जवळ येत असतानाच ‘क्लिअरटॅक्स’ ने विवरणपत्र सादर करण्याची सुविधा शाओमी या एमआययूआय प्रणालीवर चालणाऱ्या स्मार्टफोनच्या एमआय कॅलेंडर अॅपवरही उपलब्ध केली आहे. येथील अॅपवर ग्राहकांना त्यांचे आयकर विवरणपत्र आता थेट सादर करता येणार आहे. ई-फायलिंगचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language